07 August 2020

News Flash

सुपरस्टार पवन कल्याणच्या चाहत्यांकडून राम गोपाल वर्माच्या ऑफिसवर दगडफेक

हैदराबादमधील ज्युबली हिल्स पोलिसांकडे  याबाबत तक्रार केली आहे

बॉलिवूड चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात तर कधी त्यांच्या चित्रपटांमुळे. आता राम गोपाल वर्मा यांनी असे काही केले आहे की दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या चाहत्यांनी त्यांच्या ऑफिसवर दगडफेक केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी हैद्राबादमधील ज्युबली हिल्स पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर तपास करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

हा वाद राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट ‘पॉवर स्टार’नंतर सुरु झाला आहे. या चित्रपटात अभिनेता पवन कल्याणचे आयुष्य चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप चाहत्यांनी राम गोपाल वर्मा यांच्यावर केला आहे. चित्रपट पाहिल्यावर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळी. त्यानंतर त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या ऑफिसवर दगडफेक केली.

या संदर्भात राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे. मला गेल्या काही दिवसांपासून अनेक धमक्या येत आहेत. पण, मी या धमक्यांना घाबरत नाही. माझ्या स्टार पॉवर या चित्रपटाला आणखी पब्लिसिटी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावेसे वाटतात असे ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 11:45 am

Web Title: pawan kalyan fans attack ram gopal varmas office avb 95
Next Stories
1 ‘दिल बेचारा’मुळे अनुपम खेर यांच्या डोळ्यांतून वाहू लागले अश्रू; म्हणाले…
2 करणसोबत काम करण्यासाठी सुशांतने माझ्या चित्रपटाला नकार दिला होता- अनुराग कश्यप
3 छोट्या पडद्यावरील अभिनेत्याच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू, आईलाही झाला संसर्ग
Just Now!
X