23 January 2021

News Flash

“रिचा चड्ढाशी काही देणघेणं नाही”; अब्रुनुकसानीच्या दाव्यावर पायलचं प्रत्युत्तर

रिचा चड्ढाने ठोकला पायल घोषविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष विरोधात अभिनेत्री रिचा चड्ढाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पायलने एका व्हिडीओच्या माध्यमातून अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. परिणामी संतापलेल्या रिचाने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दरम्यान पायलने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली.

अवश्य पाहा – १० कलाकार अन् दिवस १००; पाहा ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक

“मला रिचा चड्ढाशी काही देणघेणं नाही. मी तिच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत. तिची नेमकी काय समस्या आहे मला माहित नाही. मी तेच बोलले जे मला अनुरागने सांगितले होते. आम्ही या प्रकरणावर कायदेशीर उत्तर देऊ.” असं म्हणत तिने रिचाला प्रत्युत्तर दिलं.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला आहे. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर. खान यालाही प्रतिवादी केले आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2020 5:41 pm

Web Title: payal ghosh richa chadha defamation suit mppg 94
Next Stories
1 Video : प्राजक्ता गायकवाडचा फिटनेस फंडा; फिट राहण्यासाठी करते ‘या’ गोष्टी
2 मिर्झापूर २ : ‘गोळ्यांच्या आवाजामुळे…’; अभिनेत्रीने सांगितला ‘शुटिंग’चा अनुभव
3 Video : इंजिनिअरिंगचा ‘तो’ पेपर आणि मिळालेला वाढीव अर्धा तास
Just Now!
X