22 November 2017

News Flash

PHOTO: विराट-अनुष्काची ‘ग्रोसरी शॉपिंग’

'मच नीडेड ब्रेक विथ माय लव्ह', असे कॅप्शन विराटने लिहिले होते.

मुंबई | Updated: July 15, 2017 3:03 PM

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

प्रसिद्ध सेलिब्रिटी जोड्यांमध्ये क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या जोडीचे नाव आघाडीवर येते. सध्या हे प्रेमीयुगुल न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वतः विराटनेही अनुष्कासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंन्टवर शेअर केला होता.

वाचा : आलोकनाथ नीना गुप्ताला डेट करत होते तेव्हा..

सध्या संपूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टी १८व्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्कला गेली आहे. स्वभाविकच अनुष्काही या सोहळ्याला उपस्थिती लावणार. पण या पुरस्कार सोहळ्यापूर्वी अनुष्काने प्रियकर विराट कोहलीसोबत परदेशात बरीच शॉपिंग केली असल्याचे दिसते. या प्रेमीयुगुलाने शुक्रवारी ग्रोसरी शॉपिंगही केली. ग्रोसरी स्टोअरमध्ये एकमेकांशी बोलण्यात मग्न झालेल्या विराट – अनुष्काचा फोटो एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या फोटोत अनुष्काने फिकट निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस आणि स्निकर्स घातलेले दिसतात. तर विराटने काळे टीशर्ट आणि निळी डेनिम घातल्याचे दिसते.

घरी कोणत्या गोष्टी घेऊन जाव्यात याविषयीच बहुधा हे दोघं चर्चा करत असावेत.

वाचा : बॉलिवूड कलाकारांनी वापरलेले कपडे चक्क एवढ्या किंमतीला विकले जातात!

Virat and Anushka makes a Fan Happy in New York! 😇❤️ #NewYorkDiaries

A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on

Virushka making a Fan Happy! 😇❤️ #NewYorkDiaries #USAvacation

A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on

विराट आणि अनुष्काने त्यांच्या चाहत्यांसोबतही काही फोटो काढले.

Much needed break with my ❤

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराटने गुरुवारी अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करत तो त्याच्या प्रेयसीसोबत व्हेकेशनवर जात असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले. विशेष म्हणजे या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरली. त्याने लिहिलंय की, ‘माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत या ब्रेकची नितांत गरज होती.’ या कॅप्शनला त्याने ‘हार्ट’चे चिन्हही जोडले आहे.

अनुष्का सध्या तिच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाची वाट पाहत आहे. शाहरुख आणि तिची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २१ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

First Published on July 15, 2017 3:03 pm

Web Title: photo anushka sharma virat kohli spotted shopping for groceries in new york