News Flash

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लगीनघाई, शुभम-कीर्ती अडकणार विवाहबंधनात

जीजी अक्कांनी आपला शब्द खरा करत पंधरा दिवसाच्या आत शुभमसाठी मुलगी शोधली.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम-कीर्तीच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. जीजी अक्कांनी आपला शब्द खरा करत पंधरा दिवसाच्या आत शुभमसाठी मुलगी शोधली. मुलगी शिकलेली नको या मतावर त्या ठाम आहेत. एकीकडे आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी कीर्ती शिक्षणाचं महत्त्व नसलेल्या घरात संसार कसा करणार याची उत्सुकता आता वाढली आहे.

आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.

लग्नानंतर शुभम कीर्तीचा संसार बहरणार की नवी संकटं उभी राहणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. ‘फुलाला सुगंध मातीचा’ दररोज रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 10:02 am

Web Title: phulala sugandh maticha shubam and kirti wedding in serial ssv 92
Next Stories
1 माझ्यासाठी आत्महत्या ही हत्येपेक्षा मोठी चिंता- प्रसून जोशी
2 चित्रचाहूल : उत्कंठावर्धक आठवडा..
3 ‘बेलबॉटम’चे चित्रीकरण पूर्ण
Just Now!
X