News Flash

अस्सल मराठी मनोरंजनासाठी व्हा सज्ज; प्लॅनेट मराठी’ आणि ‘रावण’ येणार एकत्र

लवकरच बिग बजेट मराठी वेब सीरिजची निर्मिती

आपली मराठी संस्कृती जपत त्याला आधुनिकतेची जोड देत आता ‘प्लॅनेट मराठी’ जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालंय.  मागील काही दिवसांत ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी ओरिजनलच्या तब्बल पाच वेबसीरिज आणि एका वेबफिल्मची घोषणा करण्यात आली. या दर्जेदार आणि नव्या कंटेंटची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आणखी एका बिग बजेट वेबसिरीजची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’ आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांची आगामी निर्मिती संस्था ‘रावण’ एकत्र येणार आहे. अद्याप या वेबसीरिजचं नाव समोर आलं नसलं तरी याबाबतची चर्चा मात्र सुरु झालीय.

बिग बजेट बोल्ड वेब सीरिज!

प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि मराठी सिनेसृष्टीला ‘रेगे’, ‘ठाकरे’ सारखे सुपरहिट सिनेमे देणारे प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. मात्र आता या वेबसीरिजच्या निमित्ताने ते एकत्र काम करणार आहेत. यावे बसीरिजविषयीच्या बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी ही बोल्ड सिरीज असणार आहे. यात अनेक कलाकारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून यात कोणाची वर्णी लागणार, हे वेबसिरीज आल्यावरच कळेल. ही वेबसीरिज साधारण जून -जुलै मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या वेबसीरिजबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”या वेबसीरिजचा आशय, मांडणी आणि आवाका इथपर्यंतच मर्यादित न राहता ही कलाकृती सर्वार्थाने मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न फक्त या वेबसिरीजपुरताच मर्यादित नसून तो ‘प्लॅनेट मराठी’च्या सगळ्याच कंटेंटसाठी लागू असेल. या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक वेबसीरिजची कथा वेगळी असून त्याची काहीतरी खासियत असणार आहे. ” ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही अक्षय बर्दापूरकर यांनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 6:47 pm

Web Title: planet marathi upcoming big budget web show with abhishek panse ravan production kpw 89
Next Stories
1 करणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्याला डेट करते अनुषा दांडेकर
2 नवी वाहिनी “झी चित्रमंदिर” येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 कबीर बेदी यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर; आत्मचरित्र उलगडणार त्यांचं आयुष्य
Just Now!
X