07 March 2021

News Flash

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला स्थगिती; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयचा अभिनय पाहिला आणि म्हणूनच थेट चित्रपटावर स्थगिती आणली, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली. निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. या निकालानंतर सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा होऊ लागली. तर नेटकऱ्यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉयला लक्ष्य केलं. सोशल मीडियावर बरेच हास्यास्पद मीम्ससुद्धा व्हायरल झाले.

निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयचा अभिनय पाहिला आणि म्हणूनच थेट चित्रपटावर स्थगिती आणली, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिले. तर चित्रपटाला स्थगिती मिळाल्यानंतर विवेक ओबेरॉयवर ‘चौकीदारा’ची नोकरी शोधण्याची वेळ आली आहे, असे एका युजरने लिहिले. काहींनी विवेकला २०२४ मध्ये राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा सल्लाही दिला.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळणार नाही. मोदींच्या बायोपिकमुळे निवडणुकीत भाजपाला झुकतं माप मिळू शकतं, असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं. निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळावी यासाठी आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला लोकसभा निवडणूक काळापर्यंत स्थगिती दिली

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:52 pm

Web Title: pm narendra modi biopic release stopped by ec memes viral on social media
Next Stories
1 शाहरुखनं कोट्यवधींना विकले तब्बल २२ सुपरहिट चित्रपटांचे हक्क
2 कॉपी-पेस्ट कॅप्शनमुळे प्रिया वारियर झाली ट्रोल
3 इम्रान हाश्मीसोबत पहिल्यांदाच काम करणार बिग बी
Just Now!
X