News Flash

मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री किम शर्माविरोधात गुन्हा दाखल

कपडे व्यवस्थित न धुतल्याने मारहाण केल्याचा आरोप मोलकरणीने केला आहे.

किम शर्मा

मोलकरणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री किम शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपडे व्यवस्थित न धुतल्याने तिला किमने मारहाण केल्याचा आरोप मोलकरणीने केला आहे. किमच्या खार इथल्या बंगल्यात ही मोलकरीण २७ एप्रिलपासून काम करत होती.

‘कपडे धुताना चुकून काळ्या ब्लाऊजचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागला होता. माझी चूक लक्षात येताच मी खरं काय ते सांगितलं आणि त्यानंतर तिची वागणूक आश्चर्यचकित करणारी होती. मोठमोठ्याने ओरडत तिने मला घराबाहेर ढकललं. पुन्हा इथं येऊ नकोस असं म्हणत शिवीगाळसुद्धा केली,’ असे आरोप मोलकरणीने केले आहेत.

या घटनेनंतर मोलकरीण पुढच्या महिन्यात तिच्याकडे पगार घेण्यासाठी गेली असता तिने पगार देण्यास नकार दिला. पुन्हा पुन्हा मागूनही पगार देत नसल्याने अखेर फिर्यादी महिलेने २७ जून रोजी खार पोलीस ठाण्यात किम विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ३२३ आणि ५०४ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मोलकरणीला पगार दिला जातो. या घटनेनंतरही मोलकरणीला पगार देण्यात आला आहे. माझा ७० हजार रुपयांचा ड्रेस खराब केल्यानंतर तिला कोणतीही मारहाण न करता नोकरीवरुन जाण्यास सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण किमने दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 10:50 am

Web Title: police complaint filed against actress kim sharma for mistreating her house help
Next Stories
1 शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने चित्रपटातून काढून टाकलं होतं- मल्लिका शेरावत
2 शब्दांच्या पलिकडले : सुनाई देती है जिसकी धड़कन
3 अंधश्रद्धेवर भाष्य करण्यासाठी ‘हा’ चित्रपट झाला आहे सज्ज!
Just Now!
X