News Flash

Photo : पूजा बेदी लवकरच बांधणार या व्यावसायिकाशी लग्नगाठ

पूजाचं हे दुसरं लग्न आहे

पूजा बेदी

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिला घटस्फोटानंतर तब्बल १५ वर्षानंतर तिचा प्रिन्स चार्मिंग सापडला आहे. तिच्या या प्रिन्स चार्मिंगसोबत ती लवकरच लग्न करणार असून याविषयीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. पूजा लवकरच मानेक कॉन्ट्रॅक्टरसोबत लग्न करणार आहे. त्यापूर्वी या दोघांनी १४ फेब्रुवारीला साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे साखरपुड्यासाठी पूजाने खास व्हॅलेंटाइन डेची निवड केल्याचं पाहायला मिळत आहे.

पूजाचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी तिने इब्राहिम फर्निचरवालासोबत १९९० मध्ये लग्न केलं होतं. मात्र काही कारणामुळे त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. या दोघांनी २००३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेत ते कायदेशीररित्या विभक्त झाले. त्यानंतर तिला तिचं दुसरं प्रेम मिळालं असून ती लवकरच लग्न करणार आहे. मात्र लग्नाची तारीख अद्याप निश्चित नसल्याचं सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

Fairy tale…. thats what happens when @farahkhanali and @libasindia @libasreshmariyaz dress us up !!!

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

मानेक कॉन्ट्रॅक्टर हे व्यावसायिक असून पूजा आणि त्यांनी एकाच शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे या दोघांची चांगली मैत्री आहे. पूजाची लेक आलिया फर्निचरवाला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सैफ अली खान झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सध्या तिच्या शुटींगच्या तारखा निश्चित नसल्यामुळे पूजाने लग्नाची तारीख निश्चित केली नाही. आलियाच्या शुट्टींगच्या तारखा आणि तिच्या लेकाच्या कॉलेजच्या सुट्ट्या निश्चित झाल्यानंतर पूजा मानेकसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 4:04 pm

Web Title: pooja bedi engaged to boyfriend maneck contractor
Next Stories
1 ‘गली बॉय’ने गाठला १०० कोटींचा टप्पा
2 पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय
3 प्रविण तरडे उलगडणार ‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा जीवनप्रवास
Just Now!
X