News Flash

Video: ‘पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही’, पूजा बेदीचा ‘त्या’ जाहिरातीवर आक्षेप

पाहा ती जाहिरात कोणती आहे..

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री संजना सांघीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. पण प्रदर्शित होताच या चित्रपटाने सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून विक्रम केला. आता संजनाने एका जाहिरातीमध्ये काम केले आहे. या जाहिरातीवर अभिनेत्री पूजा बेदीने आक्षेप घेतला आहे.

लायन्सगेट प्ले शोची नुकतीच एक जाहिरात प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीमध्ये संजना एका मुलाला आठ वेळा कानाखाली मारताना दिसत आहे. ही जाहिरात पाहून पूजा बेदीने त्यावर आक्षेप घेतला आहे. तिने ट्विट करत पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही असे म्हटले आहे.

‘ही जाहिरात पाहाताना आश्चर्य वाटले. पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही. जर जाहिरातीमध्ये एक पुरुष माहिलेला मारत असेल तर?’ अशा आशयाचे ट्विट पूजा बेदीने केले आहे. सध्या पूजाचे हे ट्विट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमणने शेअर केलेल्या न्यूड फोटोवर वक्तव्य करत पाठिंबा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 10:53 am

Web Title: pooja bedi is horrified with sanjana sanghi mercilessly slapping a man in advertisement avb 95
Next Stories
1 बिकिनीतील फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांवर ‘तारक मेहता..’मधील सोनू भडकली, म्हणाली..
2 सनी लिओनी आई तर इमरान हाशमी वडील… बिहारमधील विद्यार्थ्याच्या आयकार्डवर इमरान म्हणतो…
3 शहनाज गिलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; मिळाले १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज
Just Now!
X