News Flash

पूजा भट्ट करणार आलियाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन?

आलिया साकारणार अनोखी भूमिका?

पूजा भट्ट, आलिया भट्ट

कमी वयात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारल्यास सध्या आलिया भट्ट हेच नाव सुचेल. दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी म्हणून नाही तर आलिया भट्ट म्हणून स्वतंत्र ओळख तिने निर्माण केलीये. तिच्या चाहत्यांचा वर्गसुद्धा मोठा आहे. वडील दिग्दर्शक असले तरी आलियाच्या एकाही चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी अद्याप केले नसून भविष्यातही करणार नाहीत हे त्यांनी याआधीच स्पष्ट केलं. त्यामुळे बापलेकीची ही प्रसिद्ध जोडी एकत्र काम करताना दिसणार नसले तरी आलियाची मोठी बहिण पूजा भट्ट तिच्यासोबत काम करणार असल्याची माहिती मिळतेय.

चित्रपटसृष्टीत जलदगतीने पुढे सरसावणाऱ्या आलियासाठी पूजा भट्ट लवकरच एक असा चित्रपट घेऊन येणार आहे ज्यातून आलियाचे दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याआधी आलियाच्या आगामी ‘दिल है के मानता नही’ या चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शन महेश भट्ट करणार असल्याची चर्चा होती. मात्र महेश भट्ट यांनी आलियाच्या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत आलिया एका मुलाखतीत म्हणाली की, ‘माझ्या वडिलांसोबत काम करणे कधी शक्य होईल असं मला वाटत नाही. त्यांनी तसा निर्णयच घेतलाय. मात्र पूजासोबत हे शक्य होऊ शकेल.’

वाचा : ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेच्या भूमिकेत तापसी

पूजा भट्टच्या या चित्रपटात आलिया यापूर्वी कधीही न साकारलेल्या भूमिकेत दिसणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबद्दल पूजा भट्टनेही जास्त माहिती उघड न करता म्हणाली की, ‘आलियासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. मात्र त्याबद्दल आता मी बोलू शकत नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 8:42 pm

Web Title: pooja bhatt to direct alia bhatt in a film
Next Stories
1 ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेच्या भूमिकेत तापसी
2 Bhoomi Poster : रक्ताने माखलेला संजय दत्त
3 आसाम आणि गुजरातमधील पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावला आमिर खान
Just Now!
X