News Flash

“राम गोपाल वर्मा यांनी माझं ब्रेन वॉश केलं”; अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

राम गोपाल वर्मा यांचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, रंगीला यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे राम गोपाल वर्मा सध्या अभिनेत्री पूनम कौरमुळे चर्चेत आहेत. राम गोपाल वर्मा यांनी माझं ब्रेन वॉश करुन एका नामांकित अभिनेत्याविरोधात बोलायला भाग पाडलं, असा खळबळजनक आरोप तिने आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

राम गोपाल वर्मा यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘पावर स्‍टार’ असं आहे. या चित्रपटावरुन अभिनेत्री पूनम कौरने राम गोपाल वर्मांवर टीका केली आहे. “कृपया या चित्रपटात आणखी एका व्यक्तीचं नाव जोडा. #RGV. हा व्यक्ती तरुणींना फोन करतो आणि त्यांच्या भावनांशी खेळतो. त्यांच्या कमजोरीचा फायदा उचलून त्यांना इतर कलाकारांविरोधात बोलायला भाग पाडतो. शिवाय त्यांचे ट्विट्स माध्यमांना पाठवतो. लहान असताना तुमच्याबद्दल खुप आदर होता परंतु आता तुमची किव येते.” अशा आशयाचं ट्विट करुन पूनमने राम गोपाल वर्मा यांच्यावर जोरदार टीका केली.

पूनम केवळ एक ट्विट करुन शांत बसली नाही. त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केलं. “मी एका देशद्रोही दिग्दर्शकाचा फोन कॉल रेकॉर्ड का नाही केला याचं मला दु:ख होतंय. या व्यक्तीने एक तास माझं ब्रेन वॉश केलं. आणि एका नामांकित अभिनेत्याविरोधात बोलायला भाग पाडलं.” असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. तिचे हे ट्विट्स सध्या चर्चेत आहेत. राम गोपाल वर्मा यांनी या ट्विटवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 7:31 pm

Web Title: poonam kaur powerstar ram gopal varma brain wash mppg 94
Next Stories
1 “माझ्या बहिणीने समजूत काढली नसती, तर..”- श्रुती झा
2 जुन्या अंजली भाभीने मालिका सोडण्यावर निर्माते असिद मोदी यांनी सोडले मौन, म्हणाले..
3 डॉक्टर डॉन मालिकेला मिळणार नवं वळण…
Just Now!
X