News Flash

पूनम पांडेचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; व्यक्त केली ‘ही’ चिंता

इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यानंतर पूनमने व्यक्त केली चिंता, म्हणाली...

सोशल मीडियावर कायम बोल्ड आणि आक्षेपार्ह फोटो शेअर करुन चर्चेत राहणारी मॉडेल, अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. मध्यंतरी गोव्यातील एका बीचवर अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे पूनम चांगलीच ट्रोल झाली होती.त्याचसोबत तिच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली होती. या प्रकरणानंतर पूनम आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

पूनम पांडे सायबर क्राइमची बळी पडली असून तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. याविषयी तिने तक्रार केली आहे. त्यामुळे तिचं अकाऊंट पुन्हा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : …म्हणून शाहरुखसोबत काम करण्यास हृतिकने दिला होता नकार

“मी इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. त्यामुळे माझं अकाऊंट हॅक झाल्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. या काळात मला माझ्या फॉलोअर्सपासून दूर रहावं लागत आहे. हा फॅनबेस तयार करण्यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे या हॅकिंगमुळे माझ्या इन्स्टाग्रामचा चुकीचा वापर होऊ नये हीच एक भीती वाटते”, असं पूनमने सांगितलं.

वाचा : ‘त्या’ दोन स्पर्धकांसाठी सुबोध भावेने लावली ‘इंडियन आयडॉल 2020’च्या मंचावर हजेरी

दरम्यान, पूनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येत असते. आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओसोबतच ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 8:32 am

Web Title: poonam pandey instagram account hack cyber crime complaint registered ssj 93
Next Stories
1 रसिकांसाठी नवे वर्ष ‘नाटय़मय’
2 Wonder Woman 1984 box office : ‘वंडर वूमन १९८४’ची ८.५० कोटी रुपयांची कमाई
3 Video: गाणं गात असतानाच लोकप्रिय गायिकेच्या केसाला लागली आग, आणि…
Just Now!
X