आपल्या अनोख्या फिगरसाठी प्रसिद्ध असलेली मॉडेल क्रिस्तिना मार्टलेचा प्लॅस्टिक सर्जरी करत असताना मृत्यू झाला. क्यूबेकला राहणारी ही मॉडेल १७ व्या वर्षापासून प्लॅस्टिक सर्जरी करत होती. आतापर्यंत तिने १०० हून अधिक प्लॅस्टिक सर्जरी केल्या होत्या. आपल्या वेबसाइटवर तिने प्लॅस्टिक सर्जरी करून तिला आपलं शरीर का सुंदर बनवायचं होतं ते सांगितलं आहे.

आपलं शरीर सुंदर दिसलेलं पाहणं ही तिची आवड होती. ‘माझ्या आतापर्यंतच्या सर्व शस्त्रक्रियेचं कारण फार सोपं आहे ते म्हणजे मला माझ्या शरीराला एका दुसऱ्या पातळीवर घेऊन जायचं आहे. त्यामुळे मी आतापर्यंत केलेल्या कोणत्याही शस्त्रक्रियेवर मला पश्चाताप नाही.’

दिल्लीच्या जंतर मंतरवर झाली स्वामी ओमची धुलाई

यापुढे ती म्हणाली की, ‘जसं तुम्हाला माहित आहे की, मला माझ्या शरीराला सुंदर दाखवायला आवडतं. माझ्या शरीरावर माझं फार प्रेम आहे. हा फक्त माझा छंद नाही तर हेच माझं आयुष्य आहे.’ २३ वर्षीय या मॉडेलचे सोशल मीडियावरील फोटो वादात सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती ‘बट सर्जरी’ करत होती. आपल्या मृत्यूच्याआधी क्रिस्तिनाने सांगितले होते की, आतापर्यंत केलेल्या सर्व सर्जरी उत्तम झाल्या असून प्रत्येकानेच शस्त्रक्रिया करावी असा सल्ला तिने दिला. पण शस्त्रक्रियेदरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला.

या खलनायकाला मिळायचे नायकांपेक्षा अधिक मानधन

आपल्या छोट्याशा कारकिर्दीत क्रिस्तिनाने नाक, तोंड, स्तन, पार्श्वभाग अशा शरीराच्या अनेक भागांवर शस्त्रक्रिया करुन घेतली होती. शस्त्रक्रियेसाठी असलेल्या तिच्या वेडेपणानेच तिला मॉडेलिंगचे करिअर खुले करुन दिले होते. तिचे इन्स्टाग्रामवर ६२० हजार फॉलोवर्सही होते.