सिद्धूची पाठराखण करणाऱ्या कॉमेडिअन कपिल शर्माला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या रोषाला सामोर जावं लागत आहे. ट्विटरवर कपिल शर्मावर बंदी घालण्याची मागणी नेटकरी करत आहे. तर ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान खानकडेही कपिलवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या वादानंतर कपिलनं आपली बाजू मांडली आहे.

एखादा प्रश्न कसा सोडवावा यावर आपल्या सगळ्यांची मतं भिन्न असू शकतात. पण मला इतकंच सांगावसं वाटतं की प्रत्येक भारतीयांप्रमाणे मी देखील या भ्याड हल्ल्यामुळे दुखावला गेलो आहे. आपले जवान या हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देतील पण तोपर्यंत शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहू असं कपिल म्हणाला.

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांची गच्छंती केल्यानंतर कपिलनं सिद्धू यांची बाजू घेतली होती. एखाद्या कलाकारावर बंदी घालणं किंवा नवज्योत सिंग सिद्धू यांची शोमधून हकालपट्टी करणं हा समस्येवर उपाय असू शकत नाही असं कपिल म्हणाला होता त्यानंतर कपिलवर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली होती.