दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या आगामी ‘भागमती’ चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करत आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले आहे. जी अशोक दिग्दर्शीत ‘भागमती’मध्ये अनुष्का आयएएस ऑफिसर संचलाच्या भूमिकेत दिसेल.

Padmaavat: अखेर दीपिकाची कंबर झाकून ‘घुमर’चे नवे व्हर्जन प्रदर्शित

नुकतीच अनुष्काने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथे तिला ‘बाहुबली’मधील तिचा सहअभिनेता प्रभासविषयी प्रश्न विचारला जाणे अपेक्षितच होते. ‘बाहुबली’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ही ‘रील लाइफ’ जोडी ‘रिअल लाइफ’मध्येही एकमेकांचे जोडीदार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यामुळेच तुम्ही दोघं लग्न करत आहात का, असा सवाल अनुष्काला करण्यात आला. मात्र, टी टाऊनचा ‘डार्लिंग’ असलेला प्रभास हा केवळ तिचा मित्र असल्याचे तिने सांगितले. याव्यतिरीक्त आमच्यात तसे काही नाही असेही ती म्हणाली.

अनुष्का म्हणाली की, आम्ही दोघंही खूप चांगले मित्र आहोत. आमच्यात मैत्रीव्यतिरीक्त कोणतेही नाते नाही. आम्ही नक्कीच लग्न करत नाही आहोत. अनुष्काच्या या उत्तराने त्यांच्या चाहत्यांच्या मनात अनेक दिवसांपासून असलेला घोळ नक्कीच मिटला असेल.

PHOTOS : आणखी एक मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

दरम्यान, ‘भागमती’ चित्रपटासाठी निर्मात्यांनी तब्बल पाच वर्षे अनुष्काची वाट पाहिल्याचेही तिने सांगितले. मी २०१२मध्येच ‘भागमती’ची स्क्रिप्ट ऐकली होती. त्याला जवळपास पाच वर्षे उलटली. ‘बाहुबली’ आणि ‘रुद्रमदेवी’ चित्रपटांचे काम माझ्या हातात असल्यामुळे मी ‘भागमती’साठी तत्काळ तारीख देऊ शकत नव्हते. त्याचसोबत मला रजनीकांत यांच्या ‘लिंगा’ आणि ‘साइज झिरो’च्या चित्रीकरणालाही सुरुवात करायची होती. पण, भूमिकेविषयी माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे युव्ही क्रिएशनचे निर्माते माझ्यासाठी २०१६पर्यंत थांबले, असे अनुष्का म्हणाली.