News Flash

प्रभासने खरेदी केली सहा कोटी रुपयांची नवी कार, पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ...

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रभास. बाहुबली म्हणून प्रसिद्धी मिळवलेला आणि घराघरात पोचलेला प्रभास अनेकांच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे. देशाच्या सर्व भागात त्याचे चाहते आहेत. आता प्रभासने नवी कार खरेदी केली असून तिची किंमत सहा कोटी रुपये आहे. ही कार चालवतानाचा प्रभासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रभासने लॅम्बोर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास सहा कोटी रुपये आहे. प्रभासच्या फॅन पेजने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रभासचे कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रभासने हैदराबादमध्ये ही कार चालवली असल्याचे देखील दिसत आहे.

प्रभासने त्याचे वडील सूर्य नारायण राजू यांच्या वाढदिवसानिमित्त ही कार घेतली आहे. आज प्रभासचे वडील ती कार पाहण्यासाठी आपल्यामध्ये नाहीत. १२ फेब्रिवारी २०१०मध्ये प्रभासच्या वडिलांचे निधन झाले. मात्र प्रभासने त्यांच्या आठवणीमध्ये ही कार खरेदी केली आहे.

लवकरच प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याच्या ‘राधेश्याम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 4:08 pm

Web Title: prabhas buy new lamborghini aventador roadster car avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस’ने राखीला दिली २५ लाख रुपयांची कार भेट?
2 होळीच्या रंगात रंगला तैमूर, बहिणीसोबत होळी खेळतानाचे फोटो व्हायरल
3 ‘वाथी कमिंग’वर शशांकचा भन्नाट डान्स, पत्नी प्रियांका म्हणाली डान्स शिकण्याची गरज
Just Now!
X