08 December 2019

News Flash

प्रदर्शनापूर्वीच प्रभासच्या ‘साहो’ने कमावले ३२० कोटी

या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी रुपये आहे.

साहो

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगमी चित्रपट ‘साहो’ची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील VFX आणि अॅक्शन सीन्स पाहण्यासारखे आहेत. या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी रुपये आहे. पण या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ३२० कोटी रुपये कमावले असल्याच्या चर्चा आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे थियेट्रिकल राइट्स ३२० कोटींना विकल्याच्या चर्चा सुरु आहेत. निर्मात्यांनी चित्रपटातील अॅक्शन सीन आणि VFX सोबत अजून कोणताच करार केलेला नाही. दरम्यान साहोचे सॅटलाइट आणि OTT प्लॅटफॉर्म राइट्सही विकलेले नाहीत. हे राइट्स विकल्यानंतर चित्रपटाच्या कमाईमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीची कमाई पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रभास आणि श्रद्धा चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहेत. या चित्रटासाठी प्रभासने १०० कोटींचे मानधन घेतल्या चर्चा सुरु होत्या. या चित्रपटानंतर प्रभास भारतीय कलाकरांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला असल्याचे म्हटले जात आहे.

३० ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हा चित्रपट भारतात तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शित सुजीत करत आहेत. या चित्रपटात प्रभास, श्रद्धा आणि चंकी व्यतिरिक्त नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

First Published on August 14, 2019 3:59 pm

Web Title: prabhas saaho movie earn 320 crore before movie release avb 95
Just Now!
X