सध्या पाहायला गेलं तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेस आणि हेल्थकडे विशेष लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये अनेक जण त्यांच्या वर्कआऊटचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्येच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचादेखील समावेश आहे. प्राजक्ता अनेकदा तिचे जीममधील फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने तिचा फिटनेस फंडा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दरम्यान, लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिचं डेली रुटीन शेअर केलं आहे. सोबतच लॉकडाउनच्या काळात घरात राहूनही फिट राहण्यासाठी