News Flash

‘त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्स्प्रेशन’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. चाहते प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. नुकताच प्राजक्ताने तिच्या फोटोशूट दरम्यानचा शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही मजामस्ती करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने “त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्सप्रेशन… ‘फोटोशूट करताना आम्ही दोघे नेहमी मस्ती करतो’ असं नेहमीच लिहिणार नाही. पण हा, तू काढलेल्या फोटोंमध्ये मला स्वत:ला पाहताना फार आनंद होतो” या आशयाचे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा मस्ती करतानाचा फोटो चर्चेत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने हा फोटो किती क्यूट आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने हा फोटो खूप मजेशीर आहे असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 4:05 pm

Web Title: prajakta mali instagram post viral avb 95
Next Stories
1 ‘मुंबई सागा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अयशस्वी, कमावले इतके कोटी
2 जेनेलियाने केली रितेशची धुलाई, व्हिडीओ शेअर करत प्रिती म्हणाली…
3 फिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल?
Just Now!
X