मागील दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी २,२३८ झाडे अखेर कापण्यात येणार आहेत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी याविरोधात आरे परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा सहभागी झाली आहे. झाडांच्या कत्तलीविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन प्राजक्ताने सोशल मीडियाद्वारे केलं आहे. या आंदोलनाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

‘मेट्रो ३ फक्त निमित्त, पुढे तिथे बाजारीकरण होऊन सिमेंटची जंगलं उभारणार.. ही खरी भीती आहे,’ असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

शिवसेनेचा विरोध मोडीत काढून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तज्ज्ञ सदस्यांच्या मदतीने गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीत झाडे कापण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेने पालिका आयुक्त झाडांचे खुनी असल्याचा आरोप करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो रेल्वे-३ प्रकल्पांतर्गत कारशेडच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा ठरणारी २,२३८ झाडे कापण्यासाठी आणि ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी प्रथम वृक्ष प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला होता.