12 December 2018

News Flash

‘या’ तारखेला प्रदर्शित होणार प्रकाश कुंटेचा ‘सायकल’

अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद लपलेला असतो

मराठी सिनेमा 'सायकल'

वायकॉम१८ मोशन पिक्चर्सने त्यांचा आगामी सायकल सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ४ मे रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सायकलच्या हलक्या फुलक्या कथेमुळे तुम्ही तुमचा स्वतःचा शोध घेण्यास सुरूवात कराल. कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. एमएफए आणि थिंक व्हाय नॉटच्या सहयोगाने हॅपी माइंडद्वारा निर्मित ‘सायकल’चे सादरीकरण वायकॉम१८ मोशन पिक्चर्सने केले आहे. हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे.

“सायकल ही एक भावनाशील आणि मनोवेधक कथा आहे जी विविध भावनांना स्पर्श करत प्रेक्षकांपर्यंत पोहचते. हा सिनेमा तुम्हाला जाणवून देतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद लपलेला असतो आणि तो साजरा करणे महत्वाचे असते. हॅपी माइंडस एंटरटेनमेंट आणि वायकॉम१८ मोशन पिक्चर्स सोबत या सिनेमासाठी काम करण्यात मला खूप आनंद मिळाला आहे,” असे सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणाले.

सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकलवर प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. केशवच्या गावात आलेल्या दोन अज्ञात व्यक्ती ही सायकल चोरतात. केशवला त्याची सायकल परत मिळते का? चोरांनी सायकल का चोरली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘सायकल’ सिनेमा नक्की पाहावा लागेल.

First Published on March 14, 2018 9:41 pm

Web Title: prakash kunte directed hrishikesh joshi bhau kadam movie cycle