News Flash

“अमित शाहांना धड खोटंही बोलता येत नाही”; ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करुन अभिनेत्याचा टोला

खरंच ५१ कोटी लोकांना कोट्यवधी रुपये मिळाले का?

भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी करोना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी एका वर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले. मोदींनी ५१ कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये पाठवले असं ते म्हणाले. या विधानावरुन अभिनेता प्रकाश राज यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकं खोटं बोलू नका असा टोला त्यांनी लगावला आहे.

अवश्य पाहा – सलमानने कतरिनाला घातली होती लग्नाची मागणी; व्हिडीओ होतोय व्हायरल

काय म्हणाले प्रकाश राज?

“किती लज्जास्पद गोष्ट आहे. या मंडळींना आता धड खोटं बोलणंही जमत नाही आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन प्रकाश राज यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

अवश्य वाचा – सोनू सूद मागतोय त्या चीनी लोकांची माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोंडिवर ते नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. अनेकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या कार्यप्रणालीवर टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 12:39 pm

Web Title: prakash raj criticize amit shah mppg 94
Next Stories
1 अजय पंडिता यांच्या हत्येवर मौन का? कंगना रणौतने बॉलिवूड कलाकारांना फटकारलं
2 काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसेवर प्रीती झिंटाचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय
3 सलमानने कतरिनाला घातली होती लग्नाची मागणी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X