News Flash

‘शेवटची फुल पँट कधी घातली होती आठवतच नाहीये’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

सर्व शूटिंग अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याने कलाकार घरीच बसले आहेत.

प्रसाद ओक

करोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. सर्व शूटिंग अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याने कलाकार घरीच बसले आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या सतत संपर्कात आहेत. अभिनेता प्रसाद ओक इन्स्टाग्रामवर भन्नाट पोस्ट लिहित असतो. त्याने नुकतीच लिहिलेली पोस्ट वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल.

‘शेवटची फुल पँट कधी घातली होती आठवतच नाहीये’, असं त्याने लिहिलंय. त्याच्या या पोस्टवर अमृता खानविलकरने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर एकाने म्हटलंय, ‘अजून काही दिवस तरी घालायला मिळेल असं वाटत नाहीये.’

आणखी वाचा : करोना व्हायरसची दहशत संपल्यानंतर इंटिमेट सीन कसे शूट करणार? दिग्दर्शकाला पडला प्रश्न

याआधी प्रसादने काही शब्द ब्रह्मांडातून गायबच झालेत असं म्हणत पत्नीसाठी पोस्ट लिहिली होती. प्रसादने या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘काही गोष्टी ब्रह्मांडातून गायबच झालेत…१- कुठे आहात? २ – घरी कधी येणार? ३ – जेवायला आहात ना?’ या पोस्टमध्ये त्याने पत्नी मंजिरी ओकला टॅग केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 11:01 am

Web Title: prasad oak funny post on full pant check this ssv 92
Next Stories
1 Video : योग्य ती खबरदारी घेऊनही ‘ती’ होती करोनाग्रस्त; कार्तिक आर्यनने घेतली मुलाखत
2 Lockdown : सोनू सूदचा नवा निर्णय; होणार ४५ हजार जणांचा अन्नदाता
3 करोना व्हायरसची दहशत संपल्यानंतर इंटिमेट सीन कसे शूट करणार? दिग्दर्शकाला पडला प्रश्न
Just Now!
X