News Flash

प्रशांत दामलेंसोबत रंगणार गप्पांची संध्याकाळ, तुम्हीही व्हा सहभागी

प्रेक्षकांना ही मुलाखत लाइव्ह पाहता येणार आहे आणि त्यात प्रशांत दामलेंना प्रश्नसुद्धा विचारता येणार आहे.

काही नाटकातल्या भूमिका या एखाद्या व्यक्तीसाठीच बनलेल्या असतात, असं म्हणतात किंवा एखाद्या कलाकाराने अजरामर केलेली रंगभूमीवरची व्यक्तिरेखाच त्यांची ओळख बनते. पण अशी एक व्यक्ती आहे जिच्याकडे पाहून एक दोन तीन नाही तर असंख्य नाटकांची नावं डोळ्यांसमोर येतात. त्यांच्या नुसत्या एण्ट्रीने होणारा टाळ्यांचा कडकडाट…टाळ्यांचा स्वीकार करण्यासाठी घेतलेला खास पॉझ आणि सतत होणाऱ्या टाळ्यांच्या आवाजात पुढचे २.३० ते ३ तास कोणालाही पोट धरून हसण्याशिवाय पर्याय नसतो… असा रंगभूमीचा लाडका अभिनेता, चिरतरुण कलाकार, उत्कृष्ट खवय्या, साखर खाल्लेला माणूस.. प्रशांत दामले हे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर गप्पा मारण्यासाठी येणार आहेत.

बुधवारी २७ मे रोजी रात्री आठ वाजल्यापासून ही गप्पांची मैफल रंगणार आहे. प्रेक्षकांना ही मुलाखत लाइव्ह पाहता येणार आहे आणि त्यात प्रशांत दामलेंना प्रश्नसुद्धा विचारता येणार आहे. Loksattalive या फेसबुक पेजवर ही मुलाखत तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे न विसरता बुधवारी २७ मे रोजी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमचेही प्रश्न तयार ठेवा.

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 4:43 pm

Web Title: prashant damle on loksatta digital adda watch his interview on facebook live ssv 92
Next Stories
1 बिहारमध्ये सोनू सुदचा पुतळा उभारण्याची तयारी सुरु; पण तो म्हणतो…
2 २२ वर्षांच्या रिअॅलिटी स्टारचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वी दिले होते संकेत
3 हॉलिवूडच्या रॅपरला टॅटूचं वेड; एक टॅटू काढायला लागले चक्क ६० तास
Just Now!
X