कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अतरंगी स्टाइल किंवा फॅशनसेन्समुळे कायम चर्चेत असतात. अशीच चर्चा सध्या अभिनेता प्रतिक बब्बरविषयी रंगली आहे. प्रतिकने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने अर्ध्या केसांना कलर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने नेलपेंट लावल्याचं दिसून येत आहे. प्रतिकचे हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
प्रतिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने त्याचे अर्धे केस आणि एक भुवईला लाल कलर लावला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो नेलपेंट लावताना दिसत आहे. हे फोटो शअर करत त्याने हटके कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
“ते माझ्यावर हसतात कारण मी वेगळा आहे. पण मी त्यांच्यावर हसतो कारण ते सगळे एकसारखेच आहेत..जोकर..”असं कॅप्शन प्रतिकने या फोटोला दिलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रतिकने शेअर केलेले हे फोटो त्याच्या आगामी चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच आगामी चित्रपटात तो तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचीदेखील चर्चा रंगली आहे. मात्र, याविषयी प्रतिकने कोणताही खुलासा केलेला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 2:41 pm