News Flash

नववर्ष संकल्प: ‘वर्षाच्या शेवटी न करण्याच्या गोष्टींची यादी बनवते’

आपल्या नवीन संकल्पाबद्दल सुरुवातीला खूप उत्साही असतो

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे

डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली की वेध लागतात ते म्हणजे नवीन वर्षात पाऊल टाकण्याचे. वर्षभरात कोणी कितीही गणितं, किंवा आकडेमोड केलेली असो वा नसो. पण, या महिन्यामध्ये किती गोष्टी चांगल्या झाल्या आणि किती गोष्टी वाईट झाल्या किंवा मनाविरुद्ध झाल्या अशी आकडेमोड करायला सुरुवात होते. या आकडेमोडीमध्ये आणखीन एक गोष्ट नव्याने जोडली जाते. ती म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प. सरत्या वर्षाचा निरोप घेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारीला लागलेल्यांचा उत्साह आता पाहण्याजोगा आहे. या उत्साहापासून कलाकारही स्वत:ला दूर ठेवू शकेलेले नाहीत. अशाच काही कलाकारांमधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे.

मी कधीच नवीन वर्षाचे संकल्प करत नाही. कारण आपण आपल्या नवीन संकल्पाबद्दल सुरुवातीला खूप उत्साही असतो. असतो पण नंतर जसजसा काळ पुढे जातो तसे आपला उत्साहही कमी होत जातो आणि पर्यायाने त्या संकल्पाचे काहीही होत नाही. पण मी एक गोष्ट प्रकर्षाने पाळते ती म्हणजे वर्षातील करावयाच्या आणि न करण्याच्या गोष्टी. या वर्षभरात काय करायचे हे मी आधी ठरवते आणि जे नाही करायचं त्याच्याकडेही लक्ष ठेवून असते. मग वर्षाच्या शेवटी ठरवलेले झाले कि नाही एवढेच पाहते. मग परत नवीन वर्षांसाठी वेगळे करावयाच्या आणि न करावयाच्या गोष्टी बनवते.

अभिनेता स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुगे’ चित्रपट येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, चलनबंदीच्या निर्णयामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमात प्रार्थना सुबोधची होणारी बायको दाखवण्यात आली आहे.

प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही? प्रेमात अपेक्षा आडव्या येतात पण मैत्री ही निस्वार्थ असते, त्यामुळेच ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ ठरते. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र-मैत्रिणी सापडतील की ज्यांना आपली दोस्ती इतर नात्यांहून अधिक खास वाटत असते. मैत्रीच्या जगात रमणाऱ्या या दोस्तांची ही केमिस्ट्री त्यांच्या कुटुंबांकरीता कधीकधी डोकेदुखी बनून जाते.

अशा या घनिष्ट मित्रांवर आगामी ‘फुगे’ हा चित्रपट आधारित आहे. प्रेम नव्हे तर प्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:18 am

Web Title: prathana behres new year resolution
Next Stories
1 पडद्यावर नव्हे; चक्क वास्तवात अमिताभ यांनी फॅक्टरीमध्ये केले काम
2 Video :अनुष्काने शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?
3 ‘दंगल’च्या कमाईतील आकडेवारीत गडबड?
Just Now!
X