19 September 2020

News Flash

अॅक्शन चित्रपटात झळकण्यास प्रतिक परमार सज्ज

या चित्रपटामध्ये फ्रेडी दारुवाला आणि हिना आचारा यांची प्रमुख भूमिका आहे.

प्रतिक परमार

बॉलिवूडप्रमाणेच सध्याच्या काळात गुजराती चित्रपटांची देखील क्रेझ वाढत आहे. त्यातच आता कमल पटेल आणि सचिन देसाई यांचा आगामी सुर्यांश हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फ्रेडी दारुवाला आणि हिना आचारा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता प्रतिक परमारदेखील झळकणार आहे.

५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये प्रतिक एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. प्रतिक स्वत: एक मार्शल आर्ट डायरेक्टर असून या चित्रपटातील अनेक अॅक्शन सीन त्याने दिग्दर्शित केले आहेत.

सुर्यांश हा एक आगळावेगळा चित्रपट असून यापूर्वी या गुजराती चित्रपटसृष्टीमध्ये अशा चित्रपटाची निर्मिती झालेली नाही. मी मार्शल आर्टचे धडे गिरविल्यामुळे मला स्टंट करताना कोणतीही अडचण आली नाही, असं प्रतिक म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 6:50 pm

Web Title: pratik paramar gujarati movie suryansh
Next Stories
1 पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर
2 Video : कधीकाळी राहुल गांधी यांच्या प्रेमातही होती करिना
3 Sui Dhaaga box office collection : ‘सुई धागा’ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
Just Now!
X