मंजुळा ही भूमिका साकारल्यानंतर तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रतिक्षा जाधव आता झी युवा वरील लोकप्रिय मालिका तुझं माझं जमतंय मध्ये पम्मीच्या भूमिकेत दिसत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. नुकतीच या मालिकेत प्रतिक्षाची एंट्री झाली. तिच्या या नवीन भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. पण एकेकाळी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्याचा खुलासा प्रतिक्षाने केला आहे.

टेलिव्हिजन हे माध्यम प्रतिक्षाला खूप आवडतं कारण या माध्यमातून रोज कलाकारांना आपल्या प्रेक्षक-चाहत्यांना भेटता येतं. पम्मी या लोकप्रिय व्यक्तिरेखेला एका उंचीवर नेऊन ठेवल्यानंतर ती भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असं प्रतिक्षाला म्हणते आणि त्यासाठी ती खूप मेहनत देखील करतेय. बॉलिवूडमधील करीना कपूर आणि राणी मुखर्जी या अभिनेत्रींनकडून तिला पम्मी साकारण्यासाठी प्रेरणा मिळते.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…

प्रतिक्षाचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे पण एकंदरीतच अभिनय क्षेत्रातील सुरक्षिततेबद्दल बोलताना ती म्हणाली, “ग्लॅमर इंडस्ट्रीतील झगमगाट जसा सगळ्यांना दिसतो तसंच या क्षेत्रातील घटना देखील लगेच चव्हाट्यावर येतात. त्यांचा गवगवा होतो म्हणून या क्षेत्राला नावं ठेवली जातात. खरं तर प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात काही घटना घडत असतातच. तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कोणत्या वर्तुळात वावरता, आणि तुमच्या मतांवर किती ठाम राहता यावर सगळं अवलंबून असतं. सुरुवातीला या क्षेत्रात येण्यासाठी मला देखील घरून विरोध झाला होता; मात्र आता पाठिंबा मिळतोय.”