प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.मात्र तरीदेखील या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे.

प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित आणि अभिजीत भोसले ज्येन्युईन प्रोडक्शन निर्मित ‘मुळशी पॅटर्न’चा ट्रेलर युट्यूबर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील फेसबुकच्या माध्यमातून ट्रेलर लॉन्च झाल्याची माहिती नेटकऱ्यांना दिली. त्यातच आता या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ‘जमीन विकायची नसते, राखायची असते’, ‘मेल्यानंतरही मारत रहा’, ‘आपला पॅटर्नचं वेगळा आहे’ ,असं दमदार संवाद पाहायला मिळत आहे.  हा ट्रेलर साहसदृश्यांनी भरलेला असल्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर या ट्रेलरमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर यासारखे कलाकारही हटके भूमिकेमध्ये दिसून येत आहेत.

दरम्यान,पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मानाची विविध पारितोषिक मिळालेल्या अनेक कलाकारांना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटातील प्रसिद्ध ‘आरारारा’ गाण्यात अमोल शिंदे आणि विठ्ठल शेलार या दोन गुन्हेगारांचा समावेश करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला होता. मात्र त्यांना गाण्यात घेण्यामागे काहीतरी कारण आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल असं सांगत प्रविण तरडेंनी एकप्रकारे याचं समर्थन केलं होतं.