27 October 2020

News Flash

Video : अंडरवॉटर शूटनंतर समीराने शेअर केला नवा व्हिडीओ

व्हिडीओ शेअर करत तिने प्रेग्नंट महिलांसाठी खास मेसेज दिला आहे

समीरा रेड्डी

‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा नऊ महिन्यांची गरोदर असून काही दिवसापूर्वी तिने अंडरवॉटर फोटोशूट केलं. चाहत्यांमध्ये तिच्या या फोटोशूटची विशेष चर्चाही रंगली होती. या फोटोशूटनंतर समीराने पुन्हा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समीरा नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच तिने प्रेग्नंट महिलांसाठी एक खास मेसेजही दिला आहे.

समीरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेकअप लुकमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ही आहे खऱ्या आयुष्यातली मी, मला माहित आहे माझा हा लूक पाहून लोक माझ्यावर टीका करतील, मात्र मला कोण काय बोलतं याला घाबरत नाही. मी तुम्हाला दाखवू इच्छिते की, सकाळी उठल्यावर आणि मेकअपशिवाय माझा चेहरा कसा असतो आणि हे सारं काही सेलिब्रेट करायला मला खूप आवडतं”, असं कॅप्शन समीराने या व्हिडीओला दिलं आहे.

सध्या समीराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन एक अंदाज येतो की समीरा तिचा प्रेग्नंसी पिरेड खूप वेगवेगळ्या प्रकारे आणि आनंदाने एन्जॉय करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने अंडरवॉटर फोटोशूट केलं. या फोटोमध्ये समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या होत्या. समीराने २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिचं फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. त्यानंतर तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे वळविला. तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

काही दिवसांपूर्वी तिने अण्डरवॉटर फोटोशूट केलं. फोटोमध्ये समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या होत्या. तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट केलाच शिवाय संपूर्ण फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. समीराचे हे अंडरवॉटर फोटो लोकाच्या पसंतीत उतरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 2:42 pm

Web Title: pregnant sameera reddy shares powerful message on body positivity in new video ssj 93
Next Stories
1 कार्तिक आर्यन करतोय का सारा अली खानला मिस ?
2 लवकरच उलगडणार राजमाता जिजाऊंचा प्रेरणादायी प्रवास
3 ही अभिनेत्री खातेय ‘फायर पान’, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X