04 June 2020

News Flash

‘प्रेम रतन धन पायो’ची ४०० कोटींची भरारी!

देशातील साडेचार हजार चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

प्रदर्शित झाल्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत प्रेम रतन धन पायोने देशात २०७ कोटींचा व्यवसाय केला होता.

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाने पुन्हा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या महिन्यात दिवाळीनंतर प्रदर्शित झालेला ‘प्रेम रतन धन पायो’ने जगभरात ४०० कोटींचा व्यवसाय केल्याची माहिती मिळाली आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास सुरुवात केली होती. देशातील साडेचार हजार चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाही फायदा चित्रपटाला मिळाला.
सुमारे १६ वर्षांनंतर सलमान खानने दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्यासोबत ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये काम केले. गेल्या महिन्यात १२ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘फॉक्स स्टार हिंदी’ने या चित्रपटाची प्रेम रतन धन पायोची निर्मिती केली आहे. त्यांनीच गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून ‘प्रेम रतन धन पायो’ने ४०० कोटींचा टप्पा ओलांडल्याचे जाहीर केले. प्रदर्शित झाल्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत या चित्रपटाने देशात २०७ कोटींचा व्यवसाय केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2015 3:47 pm

Web Title: prem ratan dhan payo collects rs 400 crore worldwide
टॅग Salman Khan
Next Stories
1 देव आनंद यांचे सर्वोत्तम १० चित्रपट..
2 रजनीकांत यांचा ‘रोबो-२’ ठरणार आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट?
3 अभिनेते दिगंबर नाईक यांच्या ‘कट टू कट’ पाच भूमिका!
Just Now!
X