09 August 2020

News Flash

‘प्राइम टाईम’ संगीत सोहळा

नामवंतांची उपस्थिती, रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि शब्द-सुरांच्या सुरेल वातावरणात हिमांशू पाटील निर्मित व प्रमोद कश्यप दिग्दर्शित ’प्राइम टाईम’

| April 24, 2015 11:19 am

नामवंतांची उपस्थिती, रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि शब्द-सुरांच्या सुरेल वातावरणात हिमांशू पाटील निर्मित व प्रमोद कश्यप दिग्दर्शित ’प्राइम टाईम’ या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. मा. छगनराव भुजबळ, केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील, अभिनेता महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांनी सिनेमाच्या संगीताचे अनावरण केले. संगीत हल्ली चित्रपटाच्या यशासाठी अधिक मह्त्त्वपूर्ण ठरू लागलंय. गीत संगीताचे अनोखे प्रयोग आता चित्रपटात होऊ लागले आहेत. प्राइम टाईम या चित्रपटातही सुमधुर गीतांची मेजवानी आहे. ‘प्राइम टाईम’ चा मुद्द्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. या ‘प्राइम टाईम’ लाही प्रेक्षकांची साथ नक्कीच मिळेल असे सांगत छगन भुजबळांनी ‘प्राइम टाईम’ चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
primetime450
मनात रूंजी घालणा-या सूरांनी या संगीत अनावरण सोहळ्यात रंग भरले. या सिनेमाची गाणी व ट्रेलर पडद्यावर पाहताना सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढत होती. गीते प्रशांत जामदार यांनी लिहिली आहेत. निरंजन पेडगांवकर यांनी संगीत दिलं आहे. तर श्रेया घोषाल, सावनी रविंद्र, जान्हवी प्रभू अरोरा, रोहित राऊत, निरंजन पेडगांवकर, ओमकार पाटील यांच्या आवाजाचा परीसस्पर्श या गीतांना लाभला आहे. ‘आली लहर आणि केला कहर’, ‘रेशमी’, ‘पावसात’, ‘जिंदगी’, ’तुझ्याविना’ अशी गीते यात आहेत.
pt450
 या गीतरचनांना नवोदित संगीतकार निरंजन पेडगांवकर यांनी अनोख्या सूरावटीमध्ये बांधलं आहे, अनेक निसर्गरम्य स्थळी ही गाणी चित्रित झाली आहेत. ‘प्राइम टाईम’ हा हलका फुलका विनोदी चित्रपट येत्या २९ मेला प्रदर्शित होणार आहे. सुलेखा तळवलकर, मिलिंद शिंत्रे, निशा परुळेकर, किशोर प्रधान  अनुराग वरळीकर, कृतिका देव, स्वयंम जाधव या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2015 11:19 am

Web Title: prime time movie music launch
टॅग Marathi Movie
Next Stories
1 आई मुलीच्या नात्यावर आधारित ‘ब्लॅकेट’चा मुहूर्त
2 पाहाः ‘दिल धडकने दो’चा टायटल ट्रॅक
3 सोशल मिडियावरील विवेकच्या मुलीचे व्हायरल छायाचित्र खोटे
Just Now!
X