18 October 2018

News Flash

जीवनाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या ‘आम्ही दोघी’

मुक्ता - प्रियाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

मुक्ता बर्वे, प्रिया बापट

चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या अभिनेत्री ‘आम्ही दोघी’ या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेमध्ये एकत्र येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर लाँच करण्यात आला.

वाचा : शशी कपूर यांच्या निधनानंतर सोनिया गांधीचे कपूर कुटुंबाला पत्र

अगदी सामान्य गृहिणीच्या भूमिकेतील मुक्ता आणि मॉडर्न प्रिया ‘आम्ही दोघी’च्या पोस्टरवर दिसतात. पोस्टवर गोळा खाताना दिसणाऱ्या या दोघीजणी जणू जीवनाचा मनमुराद आनंद कसा लुटावा याचाच संदेश देत असल्याचे दिसते. एकंदरीत पोस्टर पाहता भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या दोन मैत्रिणींची कथा या चित्रपटात पाहायला मिळू शकते.

वाचा : शनाया वागणार ‘शान्यासारखं’!

मुक्ता – प्रियाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार तर आहेच. पण त्याचसोबत अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर आणि सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहीत असलेल्या प्रतिमा जोशी याही या चित्रपटाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

First Published on December 7, 2017 2:37 pm

Web Title: priya bapat mukta barve amhi doghi movie poster