26 February 2021

News Flash

कॉपी-पेस्ट कॅप्शनमुळे प्रिया वारियर झाली ट्रोल

काही वेळातच प्रियाने कॅप्शन बदलून फोटो पुन्हा पोस्ट केला

प्रिया वारियर

प्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन नाही. मल्याळम अभिनेत्री प्रियाच्या नावाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली आणि यासाठी कारण होते तिच्या ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटातील व्हायरल झालेला एक व्हिडिओ. नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली होती. ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकांनी तर तिला ट्रोलही केले आहे.

प्रिया वारियर सध्या एका परफ्युम ब्रॅन्डच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने या ब्रॅन्डचे प्रमोशन करण्यासाठी त्याचा एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. परंतु फोटो शेअर करताना तिने कंपनीने पाठवलेली माहिती जशीच्या तशी कॉपी पेस्ट केली. ‘फेसबुक आणि इन्टाग्रामवर टाकायची माहिती’ असे त्या पोस्टमध्ये लिहिले होते. काही वेळातच प्रियाने ती पोस्ट हटवली. पण ती हटवे पर्यंत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. काही वेळातच प्रियाने कॅप्शन बदलून तो फोटो पुन्हा पोस्ट केला.

या आधीही अभिनेत्री दिशा पटानीने देखील एका ब्रॅन्डच्या प्रमोशन पोस्टमध्ये चुकीचे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला होता.

कंपनीने पाठवलेल्या मेल मधील माहिती न वाचताच तिने पोस्ट केली होती. लाखो चाहते असणारी दिशा या पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:31 pm

Web Title: priya prakash varrier copy paste wrong caption
Next Stories
1 इम्रान हाश्मीसोबत पहिल्यांदाच काम करणार बिग बी
2 ‘मणिकर्णिका’नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यास कंगना सज्ज
3 रणवीरसोबत तिसऱ्या चित्रपटात काम करण्याबाबत आलियाने केला ‘हा’ खुलासा
Just Now!
X