18 December 2018

News Flash

इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया वारियरची जबरदस्त कमाई

तिच्या एका पोस्टची किंमत आहे...

प्रिया वारियर

प्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन नाही. या मल्याळम अभिनेत्रीची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली. तिची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली. एका दिवसात इन्स्टाग्रामवर सर्वांत जास्त फॉलोअर्स मिळवणारी प्रिया इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जबरदस्त कमाई करत आहे.

आगामी ‘उरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटाच्या ट्रेलरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यातील चेहऱ्यावरील हावभाव आणि दिलखेचक अदांनी तिने अनेकांना घायाळ केलं. याच प्रसिद्धीमुळे इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सचा आकडा वाढला. सध्या तिने या अकाऊंटवर अनेक मोठमोठ्या ब्रँडचं प्रमोशन सुरू केलं आहे. एखाद्या ब्रँडची एक पोस्ट करण्यासाठी तिला आठ लाख रुपये मिळतात. तिची लोकप्रियता आणि फॉलोअर्सचा वाढता आकडा पाहता अनेक मोठे ब्रँड्स प्रमोशनसाठी प्रियाकडे विचारणा करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे प्रिया चांगलीच कमाई करत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे ५१ लाख फॉलोअर्स आहेत. कमी वेळेत फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होणाऱ्या जगातील मोजक्या सेलिब्रिटींच्या यादीत प्रियाचा समावेश झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा उल्लेख ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही केला जातोय.

मल्याळम चित्रपटातून ती पदार्पण करत आहे. ओमर लुलु दिग्दर्शित ‘उरू अदार लव्ह’ हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First Published on March 8, 2018 6:54 pm

Web Title: priya prakash varrier earns whopping amount from promotional instagram post