News Flash

प्रिया म्हणते, प्रत्येकानं केरळवासीयांना केलेल्या मदतीचा आकडा जाहीर करावा कारण…

प्रियानं नुकतच केरळमधील पुरग्रस्तांसाठी १ लाख रुपये दान केले. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा आकडा जाहीर केला आहे.

प्रियानं नुकतच केरळमधील पुरग्रस्तांसाठी १ लाख रुपये दान केले. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा आकडा जाहीर केला आहे.

आपल्या नजरेनं घाळाय करणारी आणि अल्पावधित सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया वारियर हिनं केरळवासीयांना केलेल्या आर्थिक मदतीचा आकडा जाहीर करण्याचं आवाहन केलं आहे. खरं तर कोणी किती दान केलंय हे कधीही सांगू नये असं म्हणतात. दान हे दान असतं त्यामुळे ते देताना त्या व्यक्तीच्या मनाचा मोठेपणा पाहायचा असतो. पण प्रिया मात्र एक वेगळंच सुचवू पाहत आहे.

प्रियानं नुकतच केरळमधील पुरग्रस्तांसाठी १ लाख रुपये दान केले. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा आकडा जाहीर केला आहे. हा आकडा जाहीर करण्यामागचा उद्देशही तिनं सांगितला आहे. आपण किती मदत केलीय हे केरळवासीयांना समजलंच पाहिजे. मदतीचा आकडा समजला तर केरळवासीय या निधीचं योग्य नियोजन करून ते वापरतील असंही प्रिया म्हणाली.

कोणालाही बळजबरी नाही ही कल्पना आवडली तर ठिक, पण हे प्रसिद्धीसाठी केलं नसून प्रत्येकानं त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये असंही ती म्हणाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 11:49 am

Web Title: priya prakash varrier on kerala floods donation
Next Stories
1 RK Studios : आर.के. स्टुडिओविषयीच्या ‘या’ रंजक गोष्टी माहित आहेत का?
2 Video :चर्चा तर होणारच, बॉलिवूडमधलं कथित जोडपं मलायका अर्जुन एकत्र
3 आर. के. स्टुडिओ विकण्याबाबत करिना कपूर म्हणते..
Just Now!
X