News Flash

…म्हणून प्रिया वारियरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा, प्रियाचा 'हा' व्हिडीओ का होतोय व्हायरल

‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रिया वारियर हे नाव आता प्रेक्षकांना नवीन राहिलेलं नाही. प्रिया अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेत असते. ‘ओरु अदार लव्ह’मधील  व्हिडीओमुळे चर्चेत आलेली प्रिया आता आणखी एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. यात सोशल मीडियावर प्रियाचा पुन्हा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

उत्तम अभिनय शैली आणि घायाळ करणारी अदा यामुळे प्रियाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे नावं आता अनेकांनाच माहीत आहे. सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिया प्रकाशझोतात आली. तिच्या पहिल्या चित्रपटातील डोळा मारतानाचा हा व्हिडीओ होता. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला नाही. पण प्रिया मात्र प्रसिद्ध झाली. आता प्रियाने आणखी एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे आणि सोशल मीडियावर सध्या त्याच व्हिडीओची चर्चा होत आहे.

अलिकडेच प्रिया वारियरने युट्युबवर तिचं नवीन चॅनेल सुरु केलं आहे. प्रिया प्रकाश वारियर असं तिच्या चॅनेलचं नाव असून या चॅनेलच्या माध्यमातून प्रियाचं एक नवीनच रुप प्रेक्षकांना पाहता आलं आहे. या चॅनेलवर प्रियाने तिचे काही गाण्याचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या या नव्या चॅनेलला आणि तिच्या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

प्रियाने रंगीला चित्रपटातील हाय रामा ये क्या हुआ हे गाणं नव्या चॅनेलवर शेअर केलं आहे. हे गाणं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. हेच गाणं प्रियाने तिच्या आवाजात गायलं असून ते शेअर केलं आहे.

दरम्यान, प्रिया सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून आता तिने तिचा मोर्चा युट्युबकडे वळवल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 3:12 pm

Web Title: priya prakash varrier video of singing hai rama yeh kya hua viral ssj 93
Next Stories
1 ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ आता नेटफ्लिक्सवर
2 कंगना रणौतला ‘गोपी बहु’चा पाठिंबा; म्हणाली…
3 कंगनाला BMC ने दिली होम क्वारंटाइनमधून सूट; कारण…
Just Now!
X