इंटरनेट सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आसते. नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ग्लॅमरस फोटो पोस्ट करत प्रिया तिच्या चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. 2018 मध्ये आलेल्या ‘ओरु अदाल लव्ह’ या सिनेमातील गाण्यामुळे प्रियाला मोठी प्रसिद्धी मिळाली. या गाण्यात केवळ डोळा मारतानाच्या काही सेकंदांच्या सीनमुळे प्रियाचं नशीब झळकलं. हा सीन त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. तर प्रियावर अनेक जण फिदा झाले होते.

नुकताच प्रियाचा आणखी एक व्हिडीओ वायरल झालाय. ‘चेक’ सिनेमाच्या सेटवरचा हा व्हिडीओ आहे. प्रिया अभिनेता नितीन सोबत ‘चेक’ या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. याच सिनेमाच्या गाण्याचं शूटिंग सुरु असताना प्रिया जमिनीवर कोसळली. यावेळीचा व्हिडीओ स्वत: प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडीओत प्रिया पळत येऊन अभिनेता नितीनच्या खांद्यावर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. मात्र प्रियाची पकड सुटल्याने ती जमिनीवर कोसळली. प्रिया पडल्यानं लगेचच सेटवरच्या इतरांनी प्रियाला उचलण्यासाठी धाव घेतली.तिला हाताला धरुन उभं केलं. खास बात म्हणजे जोरात पडल्यानंतरही प्रियानं आपण ठिक असल्याचं म्हणत ती लगेचच पुढच्या शुटींगसाठी तयार झाली.यावरुन प्रियाचं तिच्या अभिनयावरचं प्रेम दिसून येतंय.

या व्हिडीओला प्रियाने एक खास कॅप्शनही दिलंय. ” हे आयुष्य कायम माझ्य़ाशी लंपडाव खेळत, मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत..मात्र प्रत्येक वेळी उठून उभी राहते” अशा आशयाचं कॅप्शन प्रियाने या व्हिडीओला दिलंय.
येत्या 26 तारखेला प्रियाचा ‘चेक’ हा तेलगू सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात नितीन सोबतच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.