‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रिया वॉरियर हे नाव आता प्रेक्षकांना नवीन राहिलेलं नाही. प्रिया अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेत असते. ‘ओरु अदार लव्ह’मधील व्हिडीओमुळे चर्चेत आलेली प्रिया आता आणखी एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. यात सोशल मीडियावर प्रियाचा पुन्हा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रियाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि सोशल मीडियावर सध्या त्याच व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओत प्रिया यशराज मुखातेच्या रॅप सॉंग बिगीनी शुट या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट एक्सप्रेशन देत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रिया वॉरियर ‘विंक आणि फायर गन’च्या एक्सप्रेशनमुळे चर्चेत आली होती. प्रिया ‘श्रीदेवी बंगलो’, ‘लव हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.