26 October 2020

News Flash

इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा व्हिडीओ पोस्ट करुन प्रियांकाने दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

आज १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन. आज देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. राजकिय मंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिने एक जूना व्हिडीओ पोस्ट करुन देशासाठी बलिदान देणाऱ्या त्या महान क्रांतिकारक महिलांना अभिवादन केलं आहे.

प्रियांका चोप्राने स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला परिवर्तनाकडे वाटचाल करतात. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा” अशा आशयाचं ट्विट करुन प्रियांकाने एका व्हिडीओद्वारे अमृत कौर, कॅप्टन लक्ष्मी सहगल, दुर्गावती देवी, कमला नेहरू, कस्तूरबा गांधी, सरोजिनी नायडू, रानी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महान महिला क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे. तिचा हा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासीयांना अधिकाधिक आत्मनिर्भर होण्याचा यावेळी त्यांनी संदेश दिला. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहुर्तावर देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा, जय हिंद!” असं ट्विट करूनही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 11:26 am

Web Title: priyanka chopra 15 august independence day of india mppg 94 2
Next Stories
1 इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
2 माजी मिस इंडियापाठोपाठ बहिणीलाही करोनाची लागण
3 बॉलिवूड कलाकरांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
Just Now!
X