News Flash

93व्या ऑस्कर नामांकनाची घोषणा, प्रियांका निकची धमाल

प्रियांकाच्या 'द व्हाइट टायगर' सिनेमाला नॉमिनेशव

नुकतचं 2021 च्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची यादी जाहिर करण्यात आलीय. लंडनमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी नामांकित सिनेमांची घोषणा केली. 93 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये प्रियांकाच्या ‘द व्हाइट टागर’ या सिनेमालादेखील नॉमिनेशन मिळालं आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑस्कर पुरस्कांची यादी जाहीर होते. मात्र यंदा करोनाच्या संकटामुळे नॉमिनेशन सोहळा मार्चमध्ये पार पडला. तर 25 एप्रिलला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय़.

या ऩॉमिनेशन सोहळ्यात प्रियांका आणि निकने चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळालं. सोहळ्यानंतरचे दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. निक जोनसने काही फोटो ट्विट करत एक पोस्ट लिहली आहे. “मला आज सकाळी या सुंदर महिलेसोबत ऑस्कर नॉमिनेश करता आलं. जिने ‘द व्हाइट टायगर’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. या संपूर्ण टीमला शुभेच्छा. मी 25 एप्रिलाला भेटीन प्रियांका” असं ट्विट निकने केलं आहे.

निकच्या ट्विटला प्रियांकाने रीट्विट केलं आहे. “माझं स्वत:च ऑस्कर..तुझ्यासोबत हे क्षण शेअर करणं खूप छान होतं.. आय लव्ह यू निक..25 एप्रिलाला ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडेल” असं तिने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
ऑक्सर पुरस्कार हा सिनेसृष्टीतल मानाचा पुरस्कार मानला जातो. विविध कॅटेगरीसाठी हे पुरस्कार दिले जातात.

तर लवकरच प्रियांका चोप्रा ओपरा विन्फ्रे यांच्या टॉक शोमध्ये झळकरणार आहे. या शोबद्दल अनेकांची उत्सुकता ताणील गेली आहे. या शोच्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्रा आधीच चर्चेत आली आहे. त्यामुळे प्रियांकाची ही मुलाखत पाहणं औत्सुक्याचं असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 10:44 am

Web Title: priyanka chopra and nick jonas announced 93 oscar nominations in london kpw 89
Next Stories
1 सोनाली कुलकर्णीची नव्या क्षेत्रात एण्ट्री, ‘या’ सिनेमाची करणार निर्मिती
2 “सन ऑफ सरदार” आहे का बुमराह? भारतीय शोधतायत त्याचं खानदान
3 25 हजारांची बिकिनी??? श्रद्धा कपूरचा हा फोटो बघाच
Just Now!
X