News Flash

मेगन- प्रिन्स हॅरीसारखंच प्रियांका-निकचंही ‘रॉयल’ फोटोशूट

ज्या फोटोग्राफरनं मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही लग्नातील फोटो काढले त्याच फोटोग्राफरकडून प्रियांका आणि निकनं फोटो काढून घेतले आहे.

मेगन आणि प्रियांका या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘Ralph Lauren’ या फॅशन ब्रँडचे सदिच्छा दूत असलेल्या प्रियांका- निकनं नुकतीच न्यूयॉर्क फॅशनविकमध्ये उपस्थिती लावली. निक आणि प्रियांकाची ही जोडी फॅशनविकमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. या फॅशनविकनंतर प्रियांका आणि निकचं फोटोशूटदेखील पार पडलं.

मात्र फोटोशूट वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. प्रियांकानं आपली खास मैत्रीण ‘डचेच ऑफ ससेक्स’ म्हणजेच मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरीसारखंच फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे ज्या फोटोग्राफरनं मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही लग्नातील फोटो काढले त्याच फोटोग्राफरकडून प्रियांका आणि निकनं फोटो काढून घेतले आहे. म्हणूनच दोन्ही जोडप्यांच्या फोटोतील साम्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मेगन आणि प्रियांका या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी फक्त काही मोजक्याच आणि जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यात प्रियांका चोप्रादेखील होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 10:26 am

Web Title: priyanka chopra and nick jonas recreated meghan markle and prince harry engagement photo
Next Stories
1 Happy Birthday Atul Kulkarni : ‘मी प्रेमात कसा पडलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे’
2 आमिरने वाचवले ‘दंगल’च्या इंजीनिअरचे प्राण; सोशल मीडियावर कौतुक
3 निर्मिती क्षेत्रानंतर आता फूड शोमध्ये चित्रांगदा सिंहचं पाऊल
Just Now!
X