20 January 2021

News Flash

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर धावतेय निक- प्रियांकाच्या प्रेमाची ‘सायकल’!

प्रियांका आणि निक जोनास हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वारंवार चर्चेत आहे. प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला निक तिला डेट करतोय अशा चर्चा

प्रियांका आणि निक यावेळी सायकल चालवत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत होते.

प्रियांका आणि निक जोनास हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वारंवार चर्चेत आहे. प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला निक तिला डेट करतोय अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. या दोघांनीही याबदद्ल मौन बाळगलं असलं तरी निक आणि प्रियांकाची वाढती जवळीक पाहता हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत हे दिसून येतं. काही दिवसांपूर्वी भारतात आलेलं हे जोडपं आता पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये दिसलं आहे.

प्रियांका आणि निक यावेळी सायकल चालवत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत होते. त्यामुळे आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या या दोघांना सायकलवरून फेरफटका मारताना पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. यावेळी त्यांच्यासोबत निकचा भाऊ ज्यो आणि त्याची प्रेयसी सोफी देखील होती.

प्रियांका आणि निक गेल्या महिन्यात भारतात आले होते. २०१७ पासून हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नाही तर हे दोघंही महिनाभरात साखरपुडा करणार असल्याच्याही चर्चा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 1:45 pm

Web Title: priyanka chopra and nick jonas went out in the city for cycling
Next Stories
1 #HappyBirthdayRanveerSingh : रणवीर म्हणजे चित्रपट फ्लॉप, कोणी दिला होता आदित्य चोप्राला सल्ला?
2 Karenjit Kaur The Untold Story of Sunny Leone trailer : “पॉर्नस्टार व देहविक्री करणाऱ्यांमध्ये काय फरक?”
3 रायगडावरील मेघडंबरीतल्या वादग्रस्त फोटोप्रकरणी रितेशने मागितली माफी
Just Now!
X