News Flash

प्रियांका चोप्राच्या तिसऱ्या हॉलिवूडपटाचे शुटिंग सुरू

ती एका हॉलिवूड सिनेमाची निर्मितीही करणार

प्रियांका चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही नवीन करत असते. आपल्या आगामी हॉलिवूड सिनेमाच्या चित्रीकरणालाही तिने सुरुवात केली आहे. या सिनेमातला तिचा नवीन अंदाज नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सिनेमात ती एका ‘योग मेसेंजर’ची व्यक्तिरेखा साकारत आहे. मंगळवारी ती ‘इझंट इट रोमॅण्टिक’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती. सिनेमाचे दृश्य न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये चित्रीत करण्यात आले होते. या दृश्यात तिच्यासोबत अभिनेता अॅडम डिवाईनही दिसत आहे. त्याने तिला मागून घट्ट पकडले असल्याचे फोटोंमध्ये दिसते. या सिनेमात प्रियांकासोबत लिआम हेम्सवर्थ ब्लॅकही आहे. २०१९ मध्ये १४ फेब्रुवारीला म्हणजेच ‘व्हेलेंटाइन डे’ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’नंतर प्रियांका लवकरच ‘अ किड लाइक जेक’ या आगामी हॉलिवूडपटात दिसणार आहे. ‘बिग बँग थिअरी’चा स्टार जिम पार्सन्स आणि क्लेअर डॅन्ससोबत ती यात दिसेल. शिवाय या वर्षाअखेरिसपर्यंत ती एका हॉलिवूड सिनेमाची निर्मितीही करणार असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या लूकवरून नेटीझन्सकडून टीका होऊ लागली होती. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला होता. प्रियांकाचा हा सेल्फी पाहून तिने ओठांची सर्जरी केली का? असा अंदाज चाहत्यांनी लावला आणि टीकांचा भडीमार सुरू केला. ‘तुझ्यासारख्या सेलिब्रिटीपेक्षा सामान्य मुलीसुद्धा खूप सुंदर दिसतात,’ अशा कमेंट्सदेखील तिच्या फोटोवर येऊ लागल्या.

याआधीसुद्धा तिने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला होता तेव्हा देखील तिच्या नाकावरून नेटीझन्सकडून टीका करण्यात आली. प्रियांकाने जवळून तो फोटो काढल्याने त्यामधील तिचे नाक पाहून सर्जरी केल्याचा संशय अनेकांना आला. ‘तुझं नाक अत्यंत विचित्र दिसत असून तू सर्जरी केलीस का ?’ असा सवालही टीकाकारांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 8:21 pm

Web Title: priyanka chopra begins shooting for third hollywood film isant it romantic with rebel wilson liam hemsworth
Next Stories
1 जेनिफर विंगेटने केलं केशवपन?
2 Munna Michael Beparwah Song: टायगरचा अफलातून डान्स सर्वांचीच मनं जिंकतोय
3 …या कारणामुळे पाहायला मिळणार मीरा- करिनामध्ये स्पर्धा
Just Now!
X