26 February 2021

News Flash

Video : होणाऱ्या सासूसोबत ‘देसी गर्ल’चे ठुमके

या पार्टीमध्ये प्रियांकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी,मधू चोप्रा आणि निकची आई उपस्थित होती.

प्रियांका चोप्रा

सासू-सून म्हटलं की भांड्याला भांडण लागणार आणि भांडणं होणार असं कायमच म्हटलं जातं. परंतु बदलत्या काळानुसार या नात्याची संकल्पना बदलत चालली आहे. सासू आणि सून या एकमेकींच्या मैत्रिणी होताना दिसत आहेत. या नात्याचं चांगलं उदाहरण नुकतंच प्रियांकाच्या ब्राइडल शॉवरवेळी पाहायला मिळालं.

अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियांका लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरु झाली असून नुकतीच न्युयॉर्कमध्ये प्रियांकाची ब्राइडल पार्टी झाली. या पार्टीमध्ये प्रियांकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी,मधू चोप्रा आणि निकची आई उपस्थित होती. या पार्टीमधला प्रियांका आणि निकच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या होणाऱ्या सासूसोबत म्हणजे निकच्या आईसोबत डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी असल्याप्रमाणे ही पार्टी एन्जॉय करत आहेत.

दरम्यान, निक आणि प्रियांका लवकरच लग्न करणार आहेत. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चत झालेली नाही. काही सूत्रांच्यामाहितीनुसार ही जोडी डिसेंबरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 11:56 am

Web Title: priyanka chopra dancing bridal shower party celebration video social media
Next Stories
1 डॉ. काशिनाथ घाणेकरांचा अभ्यास न करता सुबोधनं साकारली भूमिका कारण…
2 ‘माधुरी’साठी बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली सोनाली कुलकर्णीची स्टायलिस्ट
3 आज येणार ‘केदारनाथ’चा टिझर!
Just Now!
X