News Flash

२१ वर्षांपूर्वी प्रियांका दिसायची अशी; पाहा देसी गर्लचं पहिलं फोटोशूट

वयाच्या १७ व्या वर्षी प्रियांकानं केलं होतं असं फोटोशूट

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही एका प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियांका आपल्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती तिच्या २१ वर्षांपुर्वीच्या फोटोमुळे चर्चेत आहे. तिचा हा थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नेहाचा हॉट डान्स झाला व्हायरल; पाहा थ्रो-बॅक व्हिडीओ

प्रियांकानं २००० साली वयाच्या १८ वर्षी मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी वयाच्या १७ वर्षी तिनं आपल्या करिअरचं पहिलं फोटोशूट केलं होतं. त्यावेळचा एक फोटो प्रियांकानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “जेव्हा मी १७ वर्षांचे होते….” असं म्हणत तिनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकण्यापूर्वी प्रियांका अशी दिसायची हे पाहून चाहते देखील अवाक् झाले आहेत. काही जणांनी तिच्या विदाऊट मेकअप फोटोचं कौतुक देखील केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 12:45 pm

Web Title: priyanka chopra first photoshoot viral mppg 94
Next Stories
1 नेहाचा हॉट डान्स झाला व्हायरल; पाहा थ्रो-बॅक व्हिडीओ
2 Video : नोरा फतेहीचा करीना कपूरच्या ‘फेविकॉल से’ गाण्यावर जबरदस्त डान्स
3 ..म्हणून ‘पतौडी पॅलेस’मध्ये ‘तांडव’च्या शूटिंगसाठी सैफने दिली परवानगी
Just Now!
X