08 March 2021

News Flash

लग्नापूर्वी प्रियांका ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट; ब्रेकअपचं कारण ठरलं…

चित्रपट फ्लॉप झाले म्हणून प्रियांकाने केलं ब्रेकअप?; अभिनेता म्हणाला...

बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवणारी प्रियांका चोप्रा एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही काळात ती आपल्या चित्रपटांपेक्षा पती निक जोनाससोबत केलेल्या फोटोशूटमुळे अधिक चर्चेत असते. परंतु लग्नापूर्वी ती अभिनेता हर्मन बावेजाला देखील डेट करत होती. मात्र त्यांचं नातं दिर्घकाळ टिकलं नाही अन् ब्रेकअप झालं.

अवश्य पाहा – याला म्हणतात खरा सुपरस्टार; चित्रपटातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले ७४ कोटी

हर्मनने अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत प्रयांकासोबत झालेल्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “लव्ह स्टोरी २०५० आणि विक्टरी हे सलग दोन चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे एखाद्या सुपरहिट चित्रपटासाठी मी प्रयत्न करत होतो. त्याचवेळी मला वॉट्स युअर राशी या चित्रपटाची ऑफर मिळाली. मी या चित्रपटासाठी माझं सर्वस्व झोकून दिलं होतं. दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांनी देखील माझ्यावर खुप विश्वास दाखवला होता. हा विश्वास मला तोडायचा नव्हता. परिणामी मी प्रियांकाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. चित्रपटावर अती लक्ष केंद्रित केल्यामुळे आमच्या नात्यात दरी निर्माण झाली. मतभेद वाढले अन् एक दिवस आमचं ब्रेकअप झालं.”

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

हर्मन बावेजाचा वॉट्स युअर राशी हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात तो १२ मुलींना भेटतो. यातील प्रत्येक मुलगी एका राशीचं प्रतिनिधित्व करते. अशी या चित्रपटाची पटकथा होती. मात्र नेहमीपेक्षा वेगळी पटकथा असतानाही हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटानंतर काहीच दिवसांत प्रियांकाचं हर्मनसोबत ब्रेकअप झालं. त्यावेळी सलग तीन चित्रपट फ्लॉप झाले म्हणून प्रियांकाने हर्मनला सोडलं अशी चर्चा होती. मात्र या मुलाखतीत हर्मनने त्या केवळ अफवा होत्या असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:37 pm

Web Title: priyanka chopra harman baweja love story and break up mppg 94
Next Stories
1 ‘निरागस सुरांशी जुळलेलं नात आजही कायम आहे’; ‘कट्यार काळजात…’साठी सुबोधची खास पोस्ट
2 ऑकलँडमध्ये ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ची स्पेशल स्क्रीनिंग
3 भावाच्या लग्नात ‘क्वीन’ने धरला ताल; पाहा,कंगनाच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ
Just Now!
X