News Flash

VIDEO: जाणून घ्या दीपिकाच्या ‘xXx…’चा ट्रेलर पाहून काय म्हणाली प्रियांका..

तो निर्णय सर्वस्वी निर्मात्यांचाच आहे.

प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण

अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही काळापासून तिच्या कामानिमित्त बराच वेळ देशाबाहेर होती. ‘क्वांटिको’ या मालिकेच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर प्रियांकाने याच मालिकेच्या दुसऱ्या पर्वातही काम करण्याचा निर्णय घेत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात प्रेक्षकांची मने जिंकण्याचा निर्धारच केला होता. ‘क्वांटिको २’ मागोमागच प्रियांका ‘बेबॉच’ या हॉलिवूडपटातूनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रियांकाच्या अभिनय क्षेत्रातील वाटचाल पाहता ती प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे असेच म्हणावे लागेल. चित्रपट आणि मालिकेच्या चित्रिकरणात व्यग्र असणाऱ्या प्रियांकाने काही दिवसांची सुट्टी घेत आता सध्या ती भारतात आली आहे. पण, मायदेशी परतूनही प्रियांकाला तिच्या कामातून काहीच उसंत मिळत नाहीये. दरम्यान, तिच्या या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत नुकतीच प्रियांकाने डिझायनर मनिष मल्होत्राने खास तिच्यासाठी आयोजित केलेल्या एका ‘डिनर पार्टी’ला हजेरी लावली होती.

मनिष मल्होत्राने आयोजित केलेल्या या पार्टीला प्रियांका, तिची आई मधु चोप्रा, अभिनेत्री दिया मिर्झा, नेहा धुपिया, अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी हजेरी लावली होती. पार्टीच्या सुरुवातीलाच प्रियांकाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत तिच्या भारत दौऱ्याविषयी चर्चा केली. अवघ्या काहीच दिवसांसाठी प्रियांका भारतात आली आहे. पण, तरीही विविध कामांमध्येच ती गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपिकाच्या आगामी ‘xXx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाविषयीसुद्धा प्रियांकाने वक्तव्य केले. प्रियांका आणि दीपिका या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची ‘मस्तानी’ आणि ‘देसी गर्ल’ यांच्यात वादाची ठिणगी उडाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, प्रियांकाच्या बोलण्यावरुन तरी तसे काहीच जाणवले नाही. प्रियांकाने यावेळी दीपिकाची फारच प्रशंसा करत ‘मी तिच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. दीपिकाला मी त्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि तिला अपेक्षित यश मिळावं यासाठी शुभेच्छाही देते’, असे प्रियांका म्हणाली. दरम्यान, ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रियांकाची अगदी ओझरती झलक पाहायला मिळत आहे, त्यामुळे भारतात दीपिकाच्या चित्रपटाप्रमाणेच ‘बेवॉच’ या चित्रपटाचाही खास ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे का? असे विचारले असता प्रियांकाने स्पष्ट केले की ‘त्याबद्दल मला काहीच ठाऊक नाही, तो निर्णय सर्वस्वी निर्मात्यांचाच आहे’.

प्रियांका चोप्रा भारतात आली असल्यामुळे सध्या ती विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जात एकच कल्ला केला होता. प्रियांकाच्या आगामी बॉलिवूड चित्रपटांविषयीची चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आली असून येत्या वर्षी ती बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकते असे संकेत प्रियांकाच्या बोलण्यातून मिळाले. प्रियांका तिच्या अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पूरेसे लक्ष देत आहे. लवकरच तिची निर्मिती असलेला दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर प्रियांकाने आता एका पंजाबी चित्रपटाच्या निर्मितीत तिचे नशीब आजमावले आहे.

manish1-759

manish2-759

manish3-759

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 9:15 am

Web Title: priyanka chopra has a special message for deepika padukones xxx at dinner party hosted by manish malhotra
Next Stories
1 FLASHBACK: सलमानचाच वाढदिवस पण पस्तीसावा
2 नववर्ष संकल्प: ‘वर्षाच्या शेवटी न करण्याच्या गोष्टींची यादी बनवते’
3 पडद्यावर नव्हे; चक्क वास्तवात अमिताभ यांनी फॅक्टरीमध्ये केले काम
Just Now!
X