News Flash

प्रियांकाची लाख मोलाची मदत! करोना योद्ध्यांना २० हजार बुटांचं वाटप

करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

प्रियंका चोप्राने विश्वसुंदरीचा खिताब पटकावल्यानंतर पहिल्या कामाचा पाच हजार रूपयांचा चेक मिळाला होता.

करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत मदतीसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुढे सरसावली आहे. तिने करोना योद्ध्यांच्या मदतीसाठी तब्बल २० हजार पादत्राणं देण्याची घोषणा केली आहे.

प्रियांकाने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. २० हजार पैकी १० हजार बूट ती लॉस एंजेलिस येथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वाटणार आहे. तर उर्वरीत १० हजार भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहे. याशिवाय जगभरातील महिला वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी तिने ७६ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Healthcare professionals around the world are working everyday to ensure our safety and fighting for us on the frontlines. Their courage, commitment and sacrifices are saving innumerable lives in this global pandemic.⁣ ⁣ While we cannot even imagine what’s it like to be in their shoes, over the past several weeks, @crocs has donated thousands of pairs to the heroes in these photos to ensure that they are not only comfortable in them, but safer in them too. Because of this, I’m so proud to partner with them to give 10,000 pairs to healthcare workers at @cedarssinai in Los Angeles and 10,000 more to healthcare professionals in public/government hospitals across India.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

या मदतीबाबत प्रियांका म्हणाली, “सध्या संपूर्ण जगावर करोना विषाणूचे संकट फिरत आहे. अशा संकटात डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी आणि पोलीस आपला जीव मुठीत धरुन काम करत आहेत. तेच खरे सुपरहिरो आहेत. त्यांच्या मदतीसाठी आपणं देखील खारीचा वाटा उचलूया.” प्रियांकाने केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी या मदतीसाठी तिचे कौतुक देखील केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 12:05 pm

Web Title: priyanka chopra helps provide 20000 pairs of footwear to corona warriors mppg 94
Next Stories
1 बिग बॉसच्या घरात रेखा यांनी महाभारतातील दुर्योधनाकडे केले होते दुर्लक्ष?
2 शाहरुखच्या ऑफिसचं विलगीकरण केंद्रात रुपांतर; पाहा व्हिडीओ
3 तेजस्विनी पंडित आज ‘२१ दुणे ४२’मध्ये लोकसत्ताच्या फेसबुकवर लाइव्ह
Just Now!
X