News Flash

प्रियांकाने लिहिलेलं पुस्तक ठरलं ‘बेस्ट सेलर’; अवघ्या १२ तासांत केला ‘हा’ विक्रम

'अनफिनिश'ला मिळालेलं प्रेम पाहून प्रियांका म्हणाली...

‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अलिकडेच प्रियांकाने लिहिलेलं ‘अनफिनिश’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. विशेष म्हणजे हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्याने एक रेकॉर्ड केला आहे.

प्रियांकाचं ‘अनफिनिश’ हे पुस्तक अवघ्या १२ तासांमध्ये ‘बेस्ट सेलर’ ठरलं आहे. याविषयी प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. “केवळ १२ तासांपेक्षा कमी कालवधीत ‘अनफिनिश’ला लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थान दिल्यामुळे मनापासून आभार. मला आशा आहे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल”, असं ट्विट प्रियांकाने केलं आहे.


‘अनफिनिश’ हे प्रियांकाचं आत्मचरित्र असून यात तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. बॉलिवूडमधील तिचा प्रवास, स्ट्रगल, अफेअर्स, निकवरचं प्रेम आणि हॉलिवूडमधील तिची एण्ट्री या सगळ्यावर तिने प्रकाश टाकल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, ‘अनफिनिश’च्या माध्यमातून प्रियांकाने पहिल्यांदाच लेखन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यामुळे प्रियांका सध्या प्रचंड उत्साही असल्याचं दिसून येत आहे. तिने इन्स्टाग्रामवर याविषयी एक पोस्टदेखील शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 10:55 am

Web Title: priyanka chopra memoir unfinished includes in best sellar in us less than 2 hhours tweet viral ssj 93
Next Stories
1 मलायकामुळे नोरा फतेहीने सोडला ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ शो?
2 शाहरुख खान- कटप्पाचा ‘हा’ चित्रपट माहित आहे का ?
3 अभिनेता शरद मल्होत्राला करोनाची लागण
Just Now!
X